Sunday, December 15, 2019

एड्स : इतिहास व प्राथमिक माहिती

 एड्स हा  नवीन रोग १९८१ साली प्रथम समजला. कापोसी सार्कोमा व एक प्रकारचा न्युमोनिया , जे  पुर्वि अगदी दुर्मिळ रोग होते, ते अचानक काही तरुण मुलांमध्ये दिसल्याने एच आय व्ही चे आस्तित्व  लक्षात आले. अशा लोकांमध्ये तोंडात सफेद बुरशी येणे, डायरिया,नागिण हेही रोग लवकर होतात, हेही आढळले.    सुरुवातीला  हा रोग समलिन्गि पुरुशांमध्ये दिसुन आला.   त्यानंतर  हिमोफिलिया  रुग्ण, ज्याना वारंवार रक्त दिले जाते, त्यांच्यात आढळला.

एड्स हा आजार एच आय व्ही व्हायरसमुळे होतो. या आजारात हळु हळु रोग प्रतिकारक शक्तिचा र्‍हास होतो आणि त्यामुळे शरीरात अनेक इतर जंतुजन्य आजार व कॅन्सर होतात. यावर उपचार घेतले नाहीत , तर हळुहळु परिस्थिती बिकट होते व त्या गंभीर पातळीला  एड्स म्हणतात. एच आय व्ही चा जंतु शरीरात जाणे व एड्स होणे, हा काळ कित्येक  वर्षे असु शकतो, अगदी १० वर्षे देखील !



एड्स : इतिहास व प्राथमिक माहिती

 एड्स हा  नवीन रोग १९८१ साली प्रथम समजला. कापोसी सार्कोमा व एक प्रकारचा न्युमोनिया , जे  पुर्वि अगदी दुर्मिळ रोग होते, ते अचानक काही तरुण म...